भजनी मालिका
← भजनांकडे परत

सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी

sada vase angin shanti | chari mukti hoti dasi

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
सदा वसे अंगीं शांती । चारी मुक्ति होती दासी ॥१॥ तोचि सखे हरीचे दास । सदा सोंवळे उदास ॥२॥ कामक्रोधाची वार्ता । अंगीं नाहीं पैं सर्वथा ॥३॥ एका जनार्दनीं निष्काम । सदा परिपूर्ण मंगळधाम ॥४॥