भजनी मालिका
← भजनांकडे परत

वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती

vanamajin neti gopika tayasin | ram krida khelavayasi ekanti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
वनमाजीं नेती गोपिका तयासीं । राम क्रीडा खेळावयासी एकांती ॥१॥ जैसा जया चित्ती हेत आहे मनीं । तैसा चक्रपाणी खेळतसे ॥२॥ जया जैसा भाव तैसा पुरविणें । म्हणोनि नारायणें अवतार ॥३॥ एका जनार्दनी घेऊनी अवतार । भक्ताचे अंतर जैसें तैसें ॥४॥