भजनी मालिका
← भजनांकडे परत

वर मुळें शेंडा खालीं दिसे बानो

var mulen shenda khalin dise bano

वर मुळें शेंडा खालीं दिसे बानो । प्रपंची रानोरान वृक्ष बारे ॥१॥ त्रिगुणाच्या शाखा उपशाखा बहुत । नाना याती येत पत्रें ज्यास ॥२॥ पक्व फळ अहं सोहं गोडी त्याची । सेवितां जीवाची आस पूरे ॥३॥ ज्ञानदेव म्हणे वृक्ष परिपूर्ण झाला । बीज रुढला जाणीवेचा ॥४॥