भजनी मालिका
← भजनांकडे परत

वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभीं च

vandilen vandaven jivachiye sathi | kinva bari tuti arambhin cha

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वंदिलें वंदावें जीवाचिये साठी । किंवा बरी तुटी आरंभीं च ॥१॥ स्वहिताची चाड ते ऐका बोल । अवघेंचि मोल धीरा अंगीं ॥ध्रु.॥ सिंपिलें तें रोंप वरीवरी बरें । वाळलिया पुरे कोंभ नये ॥२॥ तुका म्हणे टाकीघायें देवपण । फुटलिया जन कुला पुसी ॥३॥