भजनी मालिका
← भजनांकडे परत

वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक

vade vani pari durlabh anubhav | chalicha chi vaho bahutek

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
वदे वाणी परि दुर्लभ अनुभव । चालीचा चि वाहो बहुतेक ॥१॥ आम्ही ऐसें कैसें राहावें निश्चळ । पाठिलाग काळ जिंकितसे ॥ध्रु.॥ वाढवितां पोट दंभाचे पसारे । येतील माघारे मुदला तोटे ॥२॥ तुका म्हणे बरें जागवितां मना । तुमच्या नारायणा अभय करें ॥३॥