भजनी मालिका
← भजनांकडे परत

वनामध्यें कांगे आलांती सकळ । विनोदेम गोपाळ ह्मणताती

vanamadhyen kange alanti sakal | vinodem gopal hmanatati

रचनाकार: संत नामदेव · अभंग
वनामध्यें कांगे आलांती सकळ । विनोदेम गोपाळ ह्मणताती ॥१॥ निशींमाजीं व्याघ्र फिरताती रानीं । जावें सक-ळांनीं घरां आतां ॥२॥ ऐकोनिया ऐसें कठीण वचन । चालिलें जीवन नेत्रींहूनी ॥३॥ वेणुनाद दूत धाडिला आह्मांसी । आलिया म्हणसी जावें आतां ॥४॥ शहाणा चतुर आहेसी नेटका । वैकुंठना-यका विचारावें ॥५॥ कामाग्नीनें कृष्ण धरिती सकल । मांडियेला खेळ मन्मथाचा ॥६॥ एक एक नारी एक एक कृष्ण । करावया पूर्ण इच्छा त्यांची ॥७॥ प्रकृतीसी ऐसा भुलला गोविंद । करिती आनंद नामा म्हणे ॥८॥