भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत

lobhavari thevuni het | kari asatya nyay nit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लोभावरी ठेवुनि हेत । करी असत्य न्याय नीत॥१॥ त्याच्या पूर्वजां पतन । नरकीं किडे होती जाण ॥ध्रु.॥ कोटिगोहत्यापातक। त्यासी घडेल निष्टंक ॥२॥ मासां श्रवे जे सुंदरा । पाजी विटाळ पितरां ॥३॥ तुका म्हणे ऐसियासी । यम गांजील सायासी ॥४॥