भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोक म्हणती मज देव । हा तों अधर्म उपाव

lok mhanati maj dev | ha ton adharma upav

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लोक म्हणती मज देव । हा तों अधर्म उपाव ॥१॥ आतां कळेल तें करीं । सीर तुझे हातीं सुरी ॥ध्रु.॥ अधिकार नाहीं । पूजा करिती तैसा कांहीं ॥२॥ मन जाणे पापा । तुका म्हणे मायबापा ॥३॥