भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोभा नवसांचा तो देव बध्दांचा

lobha navasancha to dev badhdancha

रचनाकार: संत रामदास · अभंग
लोभा नवसांचा तो देव बध्दांचा। आणि मुमुक्षांचा गुरू देव गुरु देव जाण तया मुमुक्षांचा। देव साधकांचा निरंजन निरंजन देव साधकांचे मनीं । सिध्द समाधानी देवरुप देवरुप झाला संदेह तुटला। तोचि एक भला भूमंडळीं भूमंडळीं रामदास्य धन्य आहे। अन्यनता पाहें शोधूनियां।