भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका

lokan kalon ala dev amhammadhin | takili upadhi tihin shanka

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लोकां कळों आला देव आम्हांमधीं । टाकिली उपाधि तिहीं शंका ॥१॥ शंका नाहीं थोरां लाहानां जीवांसि । कळला हा हृषीकेशी मग ॥ध्रु.॥ तेव्हा मग झाले निर्भर सकळ । संगें लोकपाळ कृष्णाचिया ॥२॥ कृष्णाचिया ओंव्या गाणें गाती गीत । कृष्णमय चित्त झालें त्यांचें ॥३॥ त्यांसि ठावा नाहीं बाहेरिल भाव । अंतरीं च वाव सुख झालें ॥४॥ सुखें तया दीस न कळे हे राती । अखंड या ज्योती गोविंदाची ॥५॥ चिंतनें चि धालीं न लगे अन्नपाणी । तुका म्हणे मनीं समाधान ॥६॥