भजनी मालिका
← भजनांकडे परत

लोखंडाचा विळा परिसासी लाविला । मागिलिया मोला मागूं नये

lokhandacha vila parisasi lavila | magiliya mola magun naye

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लोखंडाचा विळा परिसासी लाविला । मागिलिया मोला मागूं नये ॥१॥ दासी होती परि रायासी रतली । मागील ते बोली बोलें नये ॥२॥ वेश्या होती तेचि पतिव्रता जाली । मागील ते बोली बोलीं नये ॥३॥ विष्णुदास नामा विठ्ठलीं रंगला । तो शिंपी वहिला म्हणों नये ॥४॥