भजनी मालिका
← भजनांकडे परत

लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला

lapanikashabden natude ha dev | maninche guhya bhav shuddha bola

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लापनिकशब्दें नातुडे हा देव । मनिंचे गुह्य भाव शुद्ध बोला ॥१॥ अंतरिंचा भेद जाणे परमानंद । जयासी संवाद करणें लागे ॥ध्रु.॥ तुका म्हणे जरी आपुलें स्वहित । तरी करीं चित्त शुद्धभावें ॥२॥