भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाजोनियां समाधीसुख । ठाके अधोमुख हरिभेटी

lajoniyan samadhisukh | thake adhomukh haribheti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
लाजोनियां समाधीसुख । ठाके अधोमुख हरिभेटी ॥१॥ म्हणोनियां रतले दास । करिती उल्हास नित्य नवा ॥२॥ ऐकोनियां नामावळी । धांवोनी कवळी ह्रदयीं त्या ॥३॥ निळा म्हणे जवळी ठाके । नेदी पारिखे दिसोंचि ॥४॥