भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसार पाहुणा दो दिवसांचा

lajon nako mana harichya kirtana | sansar pahuna do divasancha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लाजों नको मना हरीच्या कीर्तना । संसार पाहुणा दो दिवसांचा ॥१॥ कंठीं नाहीं आइती ह्मणोनि सांडूं नको ज्योति । इतुकिये प्रांती पडूं नको ॥२॥ बाळकाचे बोल माउली प्रीति करी । तैसी कीर्ति हरी परिसे चित्तें ॥३॥ भलतिया परी बोले बा श्रीहरी । तो भवसागरीं तारील जाणा ॥४॥ येणें तारुण्यपणें भ्रमलसि झणीं । भोगिसी पतनी जन्मतरीं ॥५॥ तूं होय मागता हरि होय दाता । शरण जांई अनंता ह्मणे नामा ॥६॥