भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाडकी लेक मी संताची । मजवरी कृपा बहुतांची

ladaki lek mi santachi | majavari krupa bahutanchi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाडकी लेक मी संताची । मजवरी कृपा बहुतांची ॥१॥ अखई चुडा हातीं आला । आंकण मोती नाकाला ॥ध्रु.॥ बोध मुराळी शृंगारीला । चवऱ्यायनशींचा सिक्का केला ॥२॥ तुका तुकी उतरला । सहनकेचा कौल दिला ॥३॥