भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाज सांडोनियां जालों शरणागत । ऐसियाचा अंत पाहसी झणीं

laj sandoniyan jalon sharanagat | aisiyacha ant pahasi jhanin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
लाज सांडोनियां जालों शरणागत । ऐसियाचा अंत पाहसी झणीं ॥१॥ गुण दोष माझे मनीं गा न धर । पतितपावन जरी म्हणविसी ॥२॥ पडावें परदेसीं हे लाज कोणासी । जरी तूं न पावसी पांडुरंगा ॥३॥ नामा म्हणे केशवा चतुरां शिरोमणी । विचारीं अंतःकरणीं मायबापा ॥२॥ नामा म्हणे केशवा चतुरां शिरोमणी । विचारीं अंतःकरणी मायबापा ॥४॥