भजनी मालिका
← भजनांकडे परत

लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी

laj vate pudhen tond dakhavitan | pari jaun atan konapashi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
लाज वाटे पुढें तोंड दाखवितां । परि जाऊं आतां कोणापाशी ॥१॥ चुकलिया कामा मागतों मुशारा । लाज फजितखोरा नाहीं मज ॥ध्रु.॥ पाय सांडूनिया फिरतों बासर । स्वामिसेवे चोर होऊनियां ॥२॥ तुका म्हणे मज पाहिजे दंडिलें । पुढें हे घडलें न पाहिजे ॥३॥