भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप राहिलें चिंतन । सर्वकाळ ध्यानीं मनीं

rup rahilen chintan | sarvakal dhyanin manin

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रुप राहिलें चिंतन । सर्वकाळ ध्यानीं मनीं ॥१॥ वाचा गुणीं लांचावली । मती विस्तारें फांकली ॥२॥ ऐसी केली तुम्ही दया । कृपाळुवा पंढरीराया ॥३॥ निळा म्हणे भूक तहान । गेली ठायीं हरपोन ॥४॥