भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी

ruchi ruchi gheun godi | premasukhen jali jodi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
रुची रुची घेऊं गोडी । प्रेमसुखें जाली जोडी ॥१॥ काळ जाऊं नेदूं वांयां । चिंतू विठोबाच्या पायां ॥ध्रु.॥ करूं भजन भोजन । धणी घेऊं नारायण ॥२॥ तुका म्हणे जीव धाला । होय तुझ्यानें विठ्ठला ॥३॥