भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक् । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण व्दिनेत्र

rup vikral bhayanak | chunchu vadhilen adhikadhik | paksha pasaroniyan adhomukh | raktavarna vdinetra

रचनाकार: संत निळोबा · अभंग
रुप विक्राळ भयानक । चुंचु वाढिलें अधिकाधिक् । पक्ष पसरोनियां अधोमुख । रक्तवर्ण व्दिनेत्र ॥१॥ क्रोधें झगडतां कृष्ण शरीरीं । येरें पक्ष धरिलें करीं । उपटूनियां सांडी पृथ्वीवरी । आपार वातें उसळलें ॥२॥ लोक मिळाले भोवतें । परीं भिताती देखोनियां त्यातें । मग धरुनियां चंचूतें दोन्ही फाळी करुं पाहे ॥३॥ अनंत हस्तांचा श्रीधर । काय ते काउळे किंकर । परी तो मायावी असूर । खग वोडणेंसी ठाकला ॥४॥ कृष्णें लत्ताप्रहारें त्यांसी । पाडियलें तोंडघसी । धरुनीयां निजकेशीं । आपणासीं ओढियेला ॥५॥ दक्षिणकरें मुष्ठीप्रहरीं । हाणितलें त्या शिरावर मस्तक फुटतां मेंदूवरी । शोणित वाहे भडभडां ॥६॥ निळा म्हणे दीर्घपापी । कागरुपिया अति विकल्पी । परी हा परमात्मा पुण्यप्रतापी । मोक्षपदासी पाठविलां ॥७॥