भजनी मालिका
← भजनांकडे परत

रुक्मिणीसी सांगे स्वयें कृष्णनाथ । याचें वस्त्र त्वरित आणुनि द्यावें

rukminisi sange svayen krushnanath | yachen vastra tvarit anuni dyaven

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रुक्मिणीसी सांगे स्वयें कृष्णनाथ । याचें वस्त्र त्वरित आणुनि द्यावें ॥१॥ आणूनियां ग्रंथीं देई जगन्माता । वस्त्र अलंकार तत्वतां काढुनी ठेवा ॥२॥ जीर्ण तें वस्त्र करुनी परिधान । वंदिले चरण कृष्णजीचे ॥३॥ एका जनार्दनीं करुनी नमन । निघाला ब्राम्हण तेथोनियां ॥४॥