भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहुनी पंढरीये जाण जो नेघे विठठलदरुशन

rahuni pandhariye jan jo neghe vithathaladarushan

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
राहुनी पंढरीये जाण जो नेघे विठठलदरुशन ॥१॥ महापातकी चांडाळ । त्याचा न व्हावा विटाळ ॥२॥ जिताची भोगी नर्क । जो विठ्ठला विन्मुख ॥३॥ न करी स्नान चंद्रभागे ॥ तो कुष्टी सर्वागें ॥४॥ नेघे पुंडलीकदरुशन । एका जनार्दनीं तया बंधन ॥५॥