भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे

rahe ubha vadavadin | tari phandin sampade

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राहे उभा वादावादीं । तरी फंदीं सांपडे ॥१॥ लव्हाळ्यासी कोठें बळ । करिल जळ आपुलें ॥ध्रु.॥ कठिणासी बळजोडा । नम्र पीडा देखेना ॥२॥ तुका म्हणे सर्वरसीं । मिळे त्यासी गोत तें ॥३॥