भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो

raho atan hen chi dhyan | dola man lampato

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
राहो आतां हें चि ध्यान । डोळा मन लंपटो ॥१॥ कोंडकोंडुनि धरीन जीवें । देहभावें ओंवाळीन ॥ध्रु.॥ होईल येणें कळसा आलें । स्थिरावलें अंतरीं ॥२॥ तुका म्हणे गोजिरिया । विठोबा पायां पडों द्या ॥३॥