भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहिला उभा विटेवरी । भक्तकैवारी म्हणउनी

rahila ubha vitevari | bhaktakaivari mhanauni

रचनाकार: संत निळोबा · अभंग
राहिला उभा विटेवरी । भक्तकैवारी म्हणउनी ॥१॥ जे जे येती ज्या ज्या भावें । तें त्यां दयावें न बोलतां ॥२॥ भुक्ति मुक्ति वांटी एका । लाविल्या फुका रिध्दिसिध्दी ॥३॥ निळा म्हणे सर्वाधिकारी । प्रेमभांडारी भक्त केले ॥४॥