भजनी मालिका
← भजनांकडे परत

राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें । जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी

raho dhyanin manin henchi nitya rupaden | je kan vadenkode alen pundalika bheti

रचनाकार: संत निळोबा · अभंग
राहो ध्यानीं मनीं हेंचि नित्य रुपडें । जे कां वाडेंकोडे आलें पुंडलिका भेटी ॥१॥ ठेवूनियां विटे दोन्ही चरण सुकुमार । विराजले कर सुंदर कटिप्रदेशीं ॥२॥ ज्यातें चिंतिताती योगी मुनिजन मानसीं । संत ज्यातें भजती नित्य कीर्तनआवेशीं ॥३॥ निळा म्हणे त्याविण दुजें नलगे मज कांहीं । जाणे अंतरीचें पांडुरंग सकळही ॥४॥