भजनी मालिका
← भजनांकडे परत

रिता ठाव न दिसें पाहतां । भरला पुरता विठ्ठल

rita thav na disen pahatan | bharala purata viththal

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
रिता ठाव न दिसें पाहतां । भरला पुरता विठ्ठल ॥१॥ जनीं वनीं विजनीं देखा । विठ्ठल सखा भरलासे ॥२॥ पाहतां पाहणें परतलें । विठ्ठलें व्यापिलेंक सर्वत्र ॥३॥ नाहीं पाहण्यासी ठाव । अवघा भाव विठ्ठल ॥४॥ एका जनादनीं व्यापक । विठ्ठल देख त्रिवभुनीं ॥५॥