भजनी मालिका
← भजनांकडे परत

राही रखुमाई सत्यभामा माता सिकवा वो कांता बहुतां परी

rahi rakhumai satyabhama mata sikava vo kanta bahutan pari

रचनाकार: संत गोणाई · अभंग
राही रखुमाई सत्यभामा माता सिकवा वो कांता बहुतां परी।।१।। संत सनकादिक साक्ष हे सकळ । येणें माझें बाळ चाळविलें ॥२॥ हा काय आमुचा धनी कीं गोसावी । नाहीं तें शिकवी लेंकुरासी ॥३॥ जाला देव तरी पडों याच्या पायां। मैदावें केलिया भलें नव्हे ।।४॥ भीड तुटलिया नेईन चोघां चारी होईल समसरी याची ||५|| देव कांहीं] आम्ही नसति ऐकिले परी नाहीं देखिले ऐसे को।।६॥ दर्शथि जे जीवित्वाची हानी। नाठवे परतोनि घराचार||७|| कैची वो पंढरी मी वो काय जाणे याच्या पुत्रपणें देखियेली ||८|| या देवासी गेटी जन्ममरण तुटी मावळली गोष्टी संसाराची ॥९ ॥ तुम्ही अवध्याजणी जीवाच्या सांगातिणी पुसा याचे मनीं काय आहे ।।१०।। देऊनियां नामा मज लावा वाटे। गोणाई म्हणे वोखटें न करा देवा ।। ११।।