भजनी मालिका

भजने

प्रेम अंगीं सदा वाचे भगवंत । प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा ॥१॥ असे घराश्रमी करीत व्यवहार । न पडे विसर विठोबाचा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रेम देऊनि सरतें केलें । आपुल्या नामें गौरविलें । माझिये वाचे श्रुंगारिले । गुणरत्नीं अमोघां ॥१॥ सर्वगुणीं गुणभरिता । सर्व रुपीं रुपमंडिता । सर्वकळा तूं कुशळता । साजती अनंता ब्रीदें चरणीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

प्रेम देवाचें देणें । देहभाव जाय जेणें । न धरावी मनें । शुद्धी देशकाळाची ॥१॥ मुक्त लज्जाविरहित । भाग्यवंत हरीभक्ती । जाले वोसंडत । नामकीर्तीपवाडे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रेम नये सांगतां बोलतां दावितां । अनुभव चित्ता चित्त जाणे ॥१॥ कासवीचें बाळ वाढे कृपादृष्टी । दुधा नाहीं भेटी अंगसंगें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रेम शांति दया शरण निर्धारेसी । बसले उदासी सर्व काळ ॥ १ ॥ काया वाचा मन निवडूनी प्राण । गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ॥ २ ॥

रचनाकार: संत नरहरी

प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतें छंदें नाचों रंगीं ॥१॥ कोणे वेळे काय गाणें । हें तो भगवंता मी नेणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रेमफांसा घालुनियां गळां । जितें धरिलें गोपाळा ॥१॥ एक्या मनाची करूनि जोडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रेमयुक्त नाम आदरें घेतां । तेथें नाहीं सुखदुःखवार्ता ॥१॥ नामीं धरुनी आवडी । उच्चारावें घडोघडी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रेमयुक्त भजन करी सर्वकाळ । विठ्ठल विठ्ठल बोले वाचे सदा ॥१॥ मृत्तिका भिजवी भाजनाकारणें । प्रेमयुक्त नाचणें नाममुखीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रेमळ तूं भक्ता माझ्या नामदेवा । जीवींचा विसावा भक्त तूंची ॥१॥ तुमचेनि माझें देवपण सत्य । चंद्रें पाझरत सोमकांत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रेमळ प्रेमळ अंतरीं प्रेमळ । नाहीं काळ वेळ तयालागीं ॥१॥ प्रेमभावें गाय विठ्ठलाचि ध्याय । मग सुखा उणें काय संसारीया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रेमळांसी विश्रांतिस्थान । महा मुक्ति कर जोडोनी । ऋद्धि सिद्धि वोळंगण । तिष्ठती जाण पंढरीये ॥१॥ धन्य धन्य विठ्ठलराव । उभा देवांचा तो देव । दरुशनेम निरसे भेव । यम काळ दुतांचें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ