भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतें छंदें नाचों रंगीं

premapisen bharalen angin | giten chhanden nachon rangin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रेमपिसें भरलें अंगीं । गीतें छंदें नाचों रंगीं ॥१॥ कोणे वेळे काय गाणें । हें तो भगवंता मी नेणें ॥२॥ वारा धावे भलतेया । तैसी माझी रंगछाया ॥३॥ टाळ मृदंग दक्षिणेकडे । आम्ही गातों पश्चिमेकडे ॥४॥ बोले बाळक बोबडें । तरी तें जननीये आवडे ॥५॥ नामा म्हणे गा केशवा । जन्मोजन्मीं देई सेवा ॥६॥