भजनी मालिका

भजने

प्रेमामृत सरिता पवित्र हरिकथा । त्रिभुवनींच्या तीर्थां मुगुटमणि ॥१॥ तेथें माझ्या मना होईं क्षेत्रवासी । राहें संतांपाशीं सुख घेतां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

फजितखोरा मना किती तुज सांगों । नको कोणा लागों मागें मागें ॥१॥ स्नेहवादें दुःख जडलेंसे अंगीं । निष्ठुर हें जगीं प्रेमसुख ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

फजितीचे देव मागती घुटीरोटी । आपणासाठीं जगा पीडितो काळतोंडें मोठीं ॥१॥ नको तया देवा आठवा मजसी । विठ्ठल मानसीं आम्हीं ध्याऊं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

फट गाढवाच्या लेका । संसार केला फूका ॥ध्रु०॥ खटपट करितां खटपट करितां गेला सारा वेळ । रामनाम घेतां तुझी बैसे दांतखीळ ॥१॥

रचनाकार: संत एकनाथ

फटकाळ देव्हारा फटकाळ अंगारा । फटकाळ विचारा चालविलें ॥१॥ फटकाळ तो देव फटकाळ तो भक्त । करवितो घात आणिका जीवा ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

फणस जंबीर कर्दळी दाटा । हातीं घेऊनि नांरगी फाटा ॥१॥ वारियाने कुंडलें हाले । डोळे मोडित राधा चाले ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

फार आठवतें निवृत्तीचे चित्तीं । सोपान स्फुंदती मुक्ताबाई ॥१॥ आम्हां माता पिता नित्य ज्ञानेश्वर । नाहीं आतां थार विश्रांतीसी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव