भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमफांसा घालुनियां गळां । जितें धरिलें गोपाळा

premaphansa ghaluniyan galan | jiten dharilen gopala

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रेमफांसा घालुनियां गळां । जितें धरिलें गोपाळा ॥१॥ एक्या मनाची करूनि जोडी । विठ्ठल पायीं घातली बेडी ॥२॥ ह्रदय करूनि बंदिखाना । विठ्ठल कोंडुनी ठेविला जाणा ॥३॥ सोहं शब्दें मार केला । विठ्ठल काकुलती आला ॥४॥ नामा म्हणे विठ्ठलासी । जीवें न सोडी सायासी ॥५॥