भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी

prem tethen vas kari | mukhin uchcharitan hari

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
प्रेम तेथें वास करी । मुखीं उच्चारितां हरी ॥१॥ प्रेमे यावें तया गांवा । चोजवी तया वैष्णवां ॥ध्रु.॥ प्रेमें पाठी लागे बळें। भक्त देखोनियां भोळे ॥२॥ प्रेम न वजे दवडितां । शिरे बळें जेथें कथा ॥३॥ तुका म्हणे थोर आशा । प्रेमा घरीं विष्णुदासां॥४॥