भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेम शांति दया शरण निर्धारेसी । बसले उदासी सर्व काळ

prem shanti daya sharan nirdharesi | basale udasi sarva kal

रचनाकार: संत नरहरी · अभंग
प्रेम शांति दया शरण निर्धारेसी । बसले उदासी सर्व काळ ॥ १ ॥ काया वाचा मन निवडूनी प्राण । गुह्य ज्ञान पूर्ण सर्व साक्षी ॥ २ ॥ सद्‍गुरूची कृपा होय जयावरी । तो हा श्रीहरीचा संत झाला ॥ ३ ॥ संत साधुजन वंदुनियां पूर्ण । वचे नारायण नाम घेतो ॥ ४ ॥ नरहरी सोनार म्हणे हरिचा दास । भावें रात्रंदिवस नाम घेतो ॥ ५ ॥