भजनी मालिका

भजने

प्रात:काळीं सांगे सकळांसी कृष्ण । नका घेऊं अन्न आज कोणी ॥१॥ सोडोनियां गायी चालीले वनासी । गडी ह्लषी-केशी खेळताती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रारब्ध क्रियमाण संचिताचा भोग । भोगिल्याची भोग तो न सुटे ॥१॥ ज्या जैसी कल्पना त्या तैशी भावना । अंती जे वासना जडोनी ठेली ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

प्रारब्धाच्या बळे देहाचें वर्तनें । काळचक्र भोवने जैसें कांहीं ॥१॥ तैसाची तो साधु जाणावा प्रसिद्धु । देहाचा संबंधु नेणे कांहीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रार्थूनि सकळां बोले देवरावो । फेडावा संदेहो वासनेचा ॥१॥ स्नानविधीलागीं जावें चंद्रभागे । संताचेनि संगें आम्ही तुम्ही ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रीति नाही राया वर्जिली ते कांता । परी तिची सत्ता जगावरी ॥१॥ तैसे दंभी जालों तरी तुझे भक्त । वास यमदूत न पाहाती ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रीति नाहीं रायें वर्जियेली कांता । परि तिची सत्ता जगावरी ॥१॥ तैसे दंभधारी आम्ही तुझे भक्त । घालूं यमदूत पा-यांतळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

प्रीतिचिया बोला नाहीं पेसपाड । भलतसें गोड करूनि घेई ॥१॥ तैसें विठ्ठलराया तुज मज आहे । आवडीनें गायें नाम तुझें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रीतिभंग माझा केला पांडुरंगा । भक्तिरस सांगा कां जी तुह्मीं ॥१॥ न म्हणऊनि कांहीं न ठेवीं चि उरी । आलों वर्मावरी एकाएकीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रीतीचा कलहे पदरासी घाली पीळ । सरों नेदी बाळ मागें पुढें पित्यासी ॥१॥ काय लागे त्यासी बळ हेडावितां कोण काळ । गोवितें सकळ जाळीं स्नेहसूत्राचीं ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

प्रीतीच्या भांडणा नाहीं शिरपाव । वचनाचे चि भाव निष्ठुरता ॥१॥ जीणें तरी एका जीवें उभयता । पुत्राचिया पिता दुखवे दुःखें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम