भजनी मालिका
← भजनांकडे परत

प्रेमभावें तुम्ही नाचा । रामरंगें रंगो वाचा

premabhaven tumhi nacha | ramarangen rango vacha

रचनाकार: संत नामदेव · अभंग
प्रेमभावें तुम्ही नाचा । रामरंगें रंगो वाचा ॥१॥ हेंचि मागों देवाजीला । आवडी शांती खरें बोला ॥२॥ जैसी माय तान्हर्‍यातें । खेळउनी चुंबी त्यातें ॥३॥ तेंवि तुम्ही संतजना । सर्वी धरावी भावना ॥४॥ हरि कोठवळा झाला । म्हणे जनी भक्तीं केला ॥५॥