भजनी मालिका

भजने

नामपाठें संदेह सर्व हा जाईल । गामपाठ गाईल प्रेमभावें ॥१॥ नामपाठ सोपा नामपाठ सोपा । अहर्निशीं बापा जप करी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें सर्व मुक्तत्त्व साधिती । नामपाठें विरक्ति हातां येत ॥१॥ नामपाठें उद्धव तरला तरला । नामपाठें झाला शापमुक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें सोपान समबुद्धि झाला । विश्रांती पावला संवत्सरीं ॥१॥ मुख्य ब्रह्मा तो नामपठ वंदी । इतर तरणे उपाधीपासोनियां ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपाठें होय शुद्ध तें शरीर । आणिक विचार न करी कांहीं ॥१॥ नामपाठ भोळे नामपाठ भोळे । शंकर तो लोळे स्मशानीं तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामपुरुषोत्तम घेई तूं आवडी । यातना कल्पकोडी नाहीं तुज ॥१॥ नाम हें आठवी नाम हें आठवी । हृदयीं सांठवी पुरुषोत्तम ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयाचा धरूनि हात। सांगे संवत्सराची मात। विठोजि म्हणे देई चित्त । ऐक गुह्यार्थ सांगतो ॥१॥ ही पुण्यभूमी पवित्र देखा । याची मूळ आदि पीठिका। सिद्धेश्वर नागेंद्र देखा । पुरातन नांदती ॥२॥

रचनाकार: संत सेना

नामयाची आपदा संसारी होत । परि न सोडीच हेत पांडुरंगीं ॥१॥ म्हणोनियां प्रिय देवासी पैं जाहला । सांभाळी वेळोवेळां नामयासी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथें ॥१॥ उभयतां बैसोनि केलासे एकान्त । आपदा आमुची होत संसारात ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयाची जनी दासी पैं म्हणती । भावें तो श्रीपती वश केला ॥१॥ दासीचा हा शब्द पूर्वापार आहे । पुराणीं हा पाहे निवाडा तो ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयाची माता विनवितसे संता । म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥ नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठलीं मीनला नामदेव ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाची माता विनवितसे संता म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥ नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठल मीनला नामदेव ||२||

रचनाकार: संत गोणाई

नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना ॥१॥ हिंडतां भागलें मजूर न मिळे । आले ते सकळ गृहालागीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामयाचे घरीं असे दासी जनी । तिनें चक्रपाणी वश केला ॥१॥ करितां कामधंदा ध्यानीं नारायण । करीत चिंतन अहोरात्न ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी ॥१॥ धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचे ठेवणें जनीस लाधलें। धन सांपडलें विटेवरी ।।१।। धन्य माझा जन्म धन्य माझा वंश | धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई

नामयाचें प्रेम केशवची जाणें । केशवासी राहणें नामयापासीं ॥१॥ केशव तोचि नामा तोचि केशव । प्रेमभक्तिभाव मागतसे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव