भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाची माता विनवितसे संता । म्हणे पुत्रनाथा काय करूं

namayachi mata vinavitase santa | mhane putranatha kay karun

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाची माता विनवितसे संता । म्हणे पुत्रनाथा काय करूं ॥१॥ नामा चाळविला पंढरिये नेला । विठ्ठलीं मीनला नामदेव ॥२॥ नेणें अन्नपाणी शिवणीं टिपणीं । अखंड चक्रपाणि ह्रदयीं वसे ॥३॥ संत म्हणती गोणाई विपरीत अवधारीं । नामा पंढरपुरीं वैष्णवांमाजीं ॥४॥