भजनी मालिका

भजने

नामयाचे भेटी ज्ञानदेव आले । लोटांगण घातलें नामदेवें ॥१॥ देऊनि आलिंगन प्रीती पडिभरें । पूजिलें आदरेम यथाविधी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाचे मुखीं घालुनी कवळु । पुसतसे गोपाळु शिणभागु ॥१॥ जें करकमळ सनकादिकां शिरीं । नामा तिहीं करीं कुरवाळिला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयाच्या नारायणें घेतली आळी । या भूमीचें महिमान सांगे म्हणे वनमाळी ॥१॥ धन्य धन्य अलंकापुर धन्य धन्य सिद्धेश्वर । धन्य इंद्रायणि तीरीं राज्य करी ज्ञानेश्वर ॥२॥

रचनाकार: संत सेना

नामयातें आम्हीं जेवविलें सांगातेम । हा दोष आम्हांतें ठेवा झणीं ॥१॥ सर्वत्र चाळक एकचि चैतन्य । वंद्य निंद्य कोण म्हणे स्वामी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयासारिखें निधान तुझिये कुसीं । धन्य तूं वो होसी जगामाजीं ॥१॥ धन्य याचें सुख देखियेलें डोळां । प्रेमाचा जिव्हाळा अलौकिक ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

नामयासी बोलतसे दामशेटी । कोणाचे कर्णी गोठी सागूं नको ॥१॥ आपणांसी देवें द्रव्य हें दिधलें । तूं कां म्हणसी वहिलें द्यावें तया ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामरुप मज आणिलें जिहीं । त्यांचिया उपकार नोहें उतराई ॥१॥ भक्तांचे उपकार कशानें फेडीं । यालागीं त्याचें उच्छिष्ट काढी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामविण मुख सर्पाचें तें बीळ । जिव्हा नव्हे काळसर्प आहे ॥१॥ वाचा नव्हे लांव जळो त्याचे जिणें । यातना भोगणें यमपुरी ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामस्मरण अहो जना । तेणें तुटें भवबंधना । येचि देहि येचि काळीं । भजीजे रे नाम जाण ॥१॥ ध्रुव अजामेळ गणिका । नाममात्रें तारिले देखा । आणिकाही भक्त देखा । मोक्ष पावले नामें एका ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामस्मरण हरिकीर्तन । एकादशीचा व्रत हरिजागरण । द्वादशी क्षीरापती सेवन । सुकृता त्या पार नाहीं ॥१॥ घडतां तिन्ही साधन । कलिमाजीं तो पावन । त्याच्या अनुग्रहें करुन । तरती जन असंख्य ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामा आणि दामा बाप लेक दोन्ही । राजाई गोणाई । सासु सुना ॥१॥ नारा महादा गोंदा विठा चवघे पुत्र । जन्मले पवित्र हरिभक्त ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

नामा ऐसें नाम तुझिया स्वरूपा । आवरण आरूपा कोण ठेवी ॥ १ ॥ तूं गुह्य चैतन्य नित्य वस्तु जाण । रहित कारण स्वयंप्रकाश ॥ २ ॥

रचनाकार: संत गोरोबा

नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टीं । पडेल कां दृष्टी पुन्हां आतां ॥१॥ ज्ञानाचा वियोग जडला ह्रद्‌‍रोग । भेटीचा प्रयोग करा देवा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव