भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी

namayachen thevanen janis ladhalen | dhan sampadalen vitevari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
नामयाचें ठेवणें जनीस लाधलें । धन सांपडलें विटेवरी ॥१॥ धन्य माझा जन्म धन्य माझा वंश । धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥ कामधाम माझे विठोबाचे पाय । दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥ माझ्या वडिलांचें सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ॥५॥ नामयाचे जनी आनंद पैं झाला । ह्रदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥