भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथें

namayachi kanta dhunen dhuya geli | parisa bhagavatachi ali kanya tethen

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामयाची कांता धुणें धुया गेली । परिसा भागवताची आली कन्या तेथें ॥१॥ उभयतां बैसोनि केलासे एकान्त । आपदा आमुची होत संसारात ॥२॥ तुम्हांसी तों देवें द्रव्य दिलें फ़ार । वस्त्र अलंकार शोभताती ॥३॥ एका जनार्दनीं बोलोनियां गोठी । होत असे कष्टी राजाई ते ॥४॥