भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचे ठेवणें जनीस लाधलें। धन सांपडलें विटेवरी

namayache thevanen janis ladhalen| dhan sampadalen vitevari

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
नामयाचे ठेवणें जनीस लाधलें। धन सांपडलें विटेवरी ।।१।। धन्य माझा जन्म धन्य माझा वंश | धन्य विष्णुदास स्वामी माझा ॥२॥ कामधाम माझे विठोबाचे पाय दिवसनिशीं पाहे हारपली ॥३॥ माझ्या वडिलांचें दैवत तो हा पंढरिनाथ । तेणें माझा अर्थ पुरविला ॥४॥ संसारीचे सुख नेघे माझे चित्तीं । तरीच पुनरावृत्ति चुकविल्या ||५|| नामयाचे जनी आनंद झाला हृदयीं बिंबला पांडुरंग ॥६॥