भजनी मालिका
← भजनांकडे परत

नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना

namayachen ghar modalen eke dinin | majur tayalaguni milechina

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
नामयाचें घर मोडलें एके दिनीं । मजुर तयालागुनी मिळेचिना ॥१॥ हिंडतां भागलें मजूर न मिळे । आले ते सकळ गृहालागीं ॥२॥ पांडुरंग तेथें होउनी मजूर । शाकारिलें घर नामयाचें ॥३॥ एका जनार्दनीं उणें नेदी भक्ता । आपण तत्वतां अंगे राबें ॥४॥