भजनी मालिका

भजने

देहनिशा क्रमोनि मी तंव आलिये । इहीं वैष्णवीं आणिलें पंढरीये ॥१॥ बाई वो मन ध्यान लागलें पंढरीचे । तें तंव जागृती स्वप्नी नवचे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहबुद्धि वसे लोभ जयां चित्तीं । आपुलें जाणती परावें जे ॥१॥ तयासि चालतां पाहिजे सिदोरी । दुःख पावे करी असत्य तो ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको ॥१॥ तूं तें तूंचि पाहीं तूं तें पाही । पाहूनियां राही जेथीच्या तेथें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहबुद्धी खुंटली येथें माया तुटली । देहाची स्थिती दैवाधीन ठेली ॥१॥ दैवाचेनी बळें देहींचे कर्म चळे । स्वसुखाचे सोहळे विदेह भावें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देहबुद्धी वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥ थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देहभाव आम्ही राहिलों ठेवूनि । निवांत चरणीं विठोबाच्या ॥१॥ आमुच्या हिताचा जाणोनि उपाव । तोचि पुढें देव करीतसे ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देहसमय अंतीं इष्टमित्र मिळती । सांभाळा म्हणती मुलें माझीं ॥१॥ स्त्री धनधान्य ते निरवुनी जात । आपुलें स्वहित विचारीना ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥ धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देहाचा पालट विठोबाचे भेटी । जळ लवणा गांठीं पडोन ठेली ॥१॥ धन्य मायबाप नामदेव माझा । तेणें पंढरिराजा दाखविलें ॥२॥

रचनाकार: संत जनाबाई