भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहभाव सर्व जाय। तेव्हां विदेही सुख होय

dehabhav sarva jay| tevhan videhi sukh hoy

रचनाकार: संत जनाबाई · अभंग
देहभाव सर्व जाय। तेव्हां विदेही सुख होय ॥१॥ तथा निर्दे जे पहुडले भव-जागृति नाहीं आले ॥२॥ ऐसी विश्रांति लाधली । आनंदकळा संचरली ॥३॥ त्या एकी एक होतां दासी जनी कैंचि आतां ॥४॥