भजनी मालिका

भजने

दोन्ही बाहीं संतांची सभा । सिंहासनी उभा श्रीविठ्ठल ॥१॥ गाती नारद तुंबर प्रेमें । हरीचें नाम गर्जती ॥२॥

दोन्ही हात ठेवुनि कटीं । उभा भीवरेच्या तटीं । कष्टलासी साठी । भक्तीकाजें विठ्ठला ॥१॥ भागलासी मायबापा । बहु श्रम केल्या खेपा । आह्मालागीं सोपा । दैत्या काळ कृतांत ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दोरा अंगीं जैसा नसतां सर्प दिसे । मिथ्या देह तैसा वस्तूवरी आभासे ॥१॥ देह मी नव्हे देह मी नव्हे । देह मी नव्हे माझेनी अनुभवें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोराच्या आधारें पर्वत चढला । पाउलासाठी केला अपघात ॥१॥ अष्टोत्तरदशें व्याधि ज्या वैद्यें दवडुनी । तो वैद्य मारूनि उत्तीर्ण जाला ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

दोरीचाचि सर्प परि होय मारक । संदेहकारक नोळखतां ॥१॥ तैसी परी केली तुम्हां माझया कर्मे । सांडविलें नेमें स्वधर्मासि ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दोषी पापराशी नामाचे धारक । होतां तिन्हीं लोक वंदिती माथां ॥१॥ नामाचें महिमान नामांचे महिमान । नामाचे महिमान शिव जाणे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोषी यमदुत नेतसे बांधोनी । तंव अवचित नाम पडलें कानीं ॥१॥ तुटलें बंधन खुंटलें पतन । नाम जनार्दन ऐकतांची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

दोहीं डोळां घालुनी वाती । पाहे वाट दिवसरातीं ॥१॥ केव्हां येशील बा धांवोनी । प्रेमपान्हा पाजिसी स्तनीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

दोहींमध्यें एक घडेल विश्वासें । भातुकें सरिसें मूळ तरी ॥१॥ करिती निरास निःशेष न घडे । कांहीं तरी ओढे चित्त माये ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्या जी आम्हां कांहीं सांगा जी रखुमाई । शेष उरलें ठायीं सनकादिकांचें ॥१॥ टोकत बाहेरी बैसलों आशा । पुराया ग्रासा एकमेकां ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

द्या जी माझा विचारोनियां विभाग । न खंडे हा लाग आहाचपणें ॥१॥ किती नेणों तुम्हां साहाते कटकट । आम्ही च वाईट निवडलों ते ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम