भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको

dehabuddhi sandin kalpana dandi | vasanechi shendi vadhavun nako

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
देहबुद्धि सांडीं कल्पना दंडी । वासनेची शेंडी वाढवूं नको ॥१॥ तूं तें तूंचि पाहीं तूं तें पाही । पाहूनियां राही जेथीच्या तेथें ॥२॥ तूं तें तूंचि पाही जेथें देहो नाहीं । मीपणे कां वायां गुंतलासी ॥३॥ एका जनार्दनीं मीपण तूंपण । नाहीं नाहीं मज तुझीच आण ॥४॥