भजनी मालिका

भजने

देवासी दुजे नावडे सर्वथा । करितां हरिकथा समाधान ॥१॥ येऊनिया नाचे कीर्तनीं सर्वदा । निवारी आपदा सर्व त्याची ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

देवासी ना गवे ग्रहांचाहीं ग्रहो तो राम रावणें आणिला रणा । सुरनर वानर भक्ता निशाचर समुह मीनलीसे सेना ।

रचनाकार: संत एकनाथ

देवासी लागे सकळांसी पोसावें । आम्हां न लगे खावें काय चिंता ॥१॥ देवा विचारावें लागे पापपुण्य । आह्मासी हे जन अवघें भलें ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवी देव झाले भोग सरले यावरी । सांगाया दुसरी ऐसी नाहीं उरली ॥१॥ हरीनाम देवनाम तुम्ही गाऊनियां जागा । पेंठवणी मागा नका ठेवूं लिगाड ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥ अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवे केले कैसे कैसे । उद्धरिले अनायसे ॥१॥ ऐका नवलायाची ठेव । नेणताही भक्तिभाव ॥ध्रु.॥ कैलासासी नेला । भिल्ल पानेडी बसैला ॥२॥

रचनाकार: संत तुकाराम

देवें दिला देह भजना गोमटा । तों या झाला भांटा बाधिकेच्या ॥१॥ ताठोनियां मान राहिली वरती । अहंकारा हातीं लवों नदी ॥ध्रु.॥

रचनाकार: संत तुकाराम

देवें भक्तालागीं उपचार मांडिले । शांति सुखसनी मागें बैसविलें । धरुनि तन्मयाचीं छत्रें गौरविलें । ज्ञानसंपत्तीचे दळभार दिधले ॥१॥ सुखें राज्य करा म्हणे त्रिमुवनीं । माझें ऐश्वर्य हें सर्वांगी लेंउनी । मिरवा भूषणें हीं यश कीर्ति दोन्हीं । माझीं आयुधें हीं देतों संतोषोनी वो ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

देवें समाधान केलें अवघेजण । चला आचमना गौतमीसी ॥१॥ वद्य त्रयोदशी दिधली समाधी । महोत्सव गोविंदीं समर्पिला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवो देवो बोले तूम जीवन भातें । मेहुडें दुभतेम जना यया ॥१॥ तैसें मना करा भजनभाव धरा । विषयपसारा टाका वेगीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

देवो म्हणती रुक्मिणी । हा येचि युगीं देखिला नयनीं । हेंचि ज्ञानसंजीवनी । जाण त्रैलोक्यासीम ॥१॥

रचनाकार: संत नामदेव