भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहधर्म विहित करी । द्वैतभाव चित्तीम न धरी

dehadharma vihit kari | dvaitabhav chittim na dhari

रचनाकार: संत नामदेव · अभंग
देहधर्म विहित करी । द्वैतभाव चित्तीम न धरी । सर्वाभूती नमस्कारी । एक आत्मा म्हणोनियां ॥१॥ एक तत्त्व एक हरि । एकचि तो नमस्कारी । आदि अंतींचा नरहरि । सकळ कुळांसी तारील ॥२॥ पवित्र त्याचेंचि कुळ । आचार त्याचाचि सुशीळ । अखंड जपे सर्वकाळ । रामकृष्ण नरहरि ॥३॥ नामा जपे नाम मंत्र । अखंड हरि नाम सहस्त्र । हाचि आमुचा निज मंत्र । रामकृष्ण गोविंद ॥४॥