भजनी मालिका
← भजनांकडे परत

देहबुद्धी वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी

dehabuddhi vase jayachiyen angin | pujyata tya jagin sukh mani

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
देहबुद्धी वसे जयाचियें अंगीं । पूज्यता त्या जगीं सुख मानी ॥१॥ थोर असे दगा जाला त्यासी हाटीं । सोडोनिया गांठी चोरीं नेली ॥ध्रु.॥ गांठीचें जाउनि नव्हे तो मोकळा । बांधिलासे गळा दंभलोभें ॥२॥ पुढिल्या उदिमा जालेंसे खंडण । दिसे नागवण पडे गांठी ॥३॥ तुका म्हणे ऐसे बोलतील संत । जाणूनियां घात कोण करी ॥४॥